Breaking News

दहशतवादाचे आव्हान

इसिस या दहशतवादी संघटनेचा वाढता प्रभाव हा जागतिक पातळीवर धोकादायक ठरू लागला आहे. वास्तविक, इसिसचा प्रभाव वाढण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे या संघटनेला सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि खुद्द अमेरिकेकडून वेळोवेळी मिळालेली मदत. या देशांच्या मदतीशिवाय इसिसचे हे विक्राळ स्वरूप समोर आलेच नसते. एका दृष्टीने ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. कारण अफगाणिस्तानमध्ये रशियाशी लढण्याकरता लादेनला अमेरिकेनेच पोसले होते. तोच लादेन काही वर्षानंतर अमेरिकेवर उलटला. आज सिरियाने हाफीज असर विरोधात निर्माण केलेला इसिसरूपी भस्मासुर त्यांच्यावरच उठला आहे. परंतु इसिसचे जाळे अन्य देशात पसरू नये म्हणून त्या, त्या देशात दहशतवादविरोधी विशेष कायदे करण्याची गरज आहे. 
दहशतवादची तीव्रता ही वाढत असून त्याचे लोण आता युरोपपर्यंत पोहचले आहे. दहशतवादाची झळ युरोपियन राष्टांना कमी प्रमाणात बसल्यामुळे दहशतवाद निर्मलून करण्यासाठी ठोस अशा उपाययोजना करण्यात युरोपियन राष्ट्र कधी पुढे आले नाही. अमेरिकेच्या वर्ल्ड टेंड्रवर सेंटरवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने जी पावले उचलली त्यामुळे अमेरिका स्वता:ला सुरक्षित करू शकली. मात्र आज इसिस चे प्राबल्य मोठया प्रमाणात वाढत चालले आहे. पॅरिस हल्ल्यानंतर बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स येथील झॅव्हेनटेम विमानतळावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे आता इसिस चे लक्ष्य युरोपीयन राष्ट्राकडे वळल्याचे दिसून आले आहे. बेल्जियम हे युरोपमधील अतिशय छोटे  राष्ट्र, दोन तासाच्या कार प्रवासाने आपण हे राष्ट्राच्या बाहेर जावू शकतो, इतके हे छोटे राष्ट्र. या देशाचे महत्व मात्र मोठया प्रमाणात आहे. युरोपियन महासंघाचे मुख्यालय बु्रसेल्स मध्ये आहे. तसेच इस्लामिक सेटविरोधात व सीरिया विरोधात कारवाई करणार्‍या नाटो संघटनेचे मुख्यालय देखील बु्रसेल्स या शहरात असल्यामुळे इसिस चा मुख्य रोख बु्रसेल्सकडे होतो. पॅरिस हल्ल्यानंतर इसिस चे पुढील लक्ष्य बेल्जियम असू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणाकडून देण्यात आला होता. तरीही हा हल्ला रोखण्यात अपयश आले.दहशतवादाची मुळ ज्या देशात राष्ट्रात पेरले जात आहे, त्या राष्ट्रासोबत आपणास सक्तीची पावले उचलावी लागतील. इराक- सीरियामध्ये संघर्ष सुरू झाला तेव्हा अनेक इस्लामिक  स्टेट ला मिळण्यासाठी युरोपियन राष्ट्रामधून अनेक मुस्लिम गेले होते. त्यात बेल्जियममधून जाणार्‍यांची संख्या सर्वाधिक होती. त्यातून अनेक जण प्रशिक्षत होवून परत आले होते. त्यांच्या सहकार्याशिवाय हा हल्ला घडवून आला नसेल, हे नक्की. दहशतवादाची समस्या ही आता एका राष्ट्राची समस्या नसून, ती जागतिक समस्या आहे. त्यामुळे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याकरिता सर्वसमावेशक, गतिमान कार्यक्रम आपल्याला आखावा लागेल.