Breaking News

कामगारांनी फसवणूकीपासून सावध रहावे : खा. उदयनराजे

कराड, 28 - सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी माथाडी कामगार संघटना किंवा तत्सम कामगार संघटना कार्यरत आहेत, पैकी काही संघटना आमच्या छायाचित्राचा किंवा नावाचा आधार घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
तथापि आम्ही संस्थापक असलेल्या शिवप्रताप माथाडी व जनरल कामगार व ट्रान्सपोर्ट युनियन, शिवाय आमचा कोणत्याही माथाडी अथवा कामगार संघटनेशी संबंध नाही. यामुळे आमच्या नावाचा किंवा याचित्राचा अनाधिकृत वापर करणार्‍या संघटनांपासून माथाडी तसेच कामगार बंधूंनी फसवणूकीपासून सावध रहावे, असे आवाहन सातारा लोकसभा मतदार संघ्।ाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.खा. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सध्या सातारा जिल्ह्यात कामगार संघटनांचा सुळसुळाट झाला आहे, कामगार संघटनांमार्फत कामगार हिताऐवजी स्वहीत साधण्यासाठी आमच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. वस्तुतः आमचा शिवप्रताप माथाडी व जनरल कामगार, व ट्रान्सपोर्ट युनियन शिवाय अन्य कोणत्याही कामगार संघटनांशी संबंध नाही. तथापि आमच्या नावाचा वापर केला नाही तर संबंधीतांची डाळ शिजणार नाही हे माहीत असलेल्या काही व्यक्ती त्यांच्या संघटनेच्या लेटरपॅड, फलेक्स बोर्डवर तसेच मेळावे, कार्यक्रमादरम्यान आमच्या नावाचा आणि छायाचित्राचा अनाधिकाराने वापर करत आहेत. याला आळा घालण्यासाठी आम्ही कायदेशीर पावलं उचलत असल्याचे सांगून उदयनराजे म्हणाले, यापूर्वी काही कामगारांची आर्थिक फसवणुक झाली आहे. यापुढेही फसवणुक होण्याची शक्यता असल्याने, सातारा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील सर्व माथाडी कामगार बंधुंनी कोणत्याही भुलथापांना बळी पडून फसवणुक करुन घेवू नका. फसवणुक करणार्‍यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करणार असल्याचेही खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट नमुद केले आहे.