सर्वोच्च न्यायालयाकडून सहाराची संपत्ती विकण्यास सेबीला परवानगी
नवी दिल्ली, दि. 29 - सर्वोच्च न्यायालयाने सेबीला सहाराची संपत्ती विकण्याची परवानगी मंगळवारी दिली आहे. यामुळे गुंतवणुकदारांचे बुडालेले पैसे त्यांना परत मिळवून देण्यासाठी
न्यायालयाने ही परवानगी दिली . सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी जामीनाचे 10 हजार कोटी रुपये उभे करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला
आहे. 27 एप्रिलला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. हा निर्णय देताना न्यायालयाने संपत्ती विकताना काही अटीदेखील घातल्या आहेत. ज्यामध्ये बाजारभावानुसार 90
टक्याहून जास्त किंमत मिळत असेल तर संपत्तीचा लिलाव करण्यात यावा मात्र जर 90 टक्यांपेक्षा कमी भाव मिळत असेल तर संपत्ती विकण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सेबी 86 ठिकाणची संपत्ती विकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहे.