Breaking News

चवदार तळ्याचे शुध्दीकरणप्रकरणी ; भरत गोगावलेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी



मुंबई,प्रतिनिधी,दि.29 -
चवदार तळ्याच्या ठिकाणी केवळ जलपूजन करण्यात आले, असून तिथे केवळ शासकीय निमंत्रणावरून स्थानिक आमदार भरत गोगावले उपस्थित होते, असा बचावात्मक पवित्रा घेत
आमदार गोगावले यांची पाठराखण फडणवीस यांनी आपल्या निवेदनात केली. महाडमधील चवदार तळ्याच्या पाण्याचे शुद्धीकरण केल्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी पुन्हा एकदा विधानसभेत गदारोळ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवेदन दिल्यानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी करीत शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवसेना आमदाराने बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचा अपमान केल्याचा आरोप आव्हाड यांनी काल केला. शिवसेना आमदार गोगावले यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला. जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो. त्यात शुद्धीकरण नव्हे जलपूजन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.