कृषी कार्यालयाच्या तोडफोडीची चौकशी करा ःसुधीर भद्रे
अहमदनगर । प्रतिनिधी । 28 - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तोडफोड करणार्या कर्मचार्यांना नेमके काय जास्त झाले होते याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनसंसदचे अध्यक्ष सुधिर भद्रे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कृृषी सहाय्यक अशोक दहिफळे, त्यांचे सोबत एक वाहन चालक व आणखी एक कर्मचार्याने कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे संगणक, वायर्स इत्यादीची मोडतोड केली. कार्यालयात धिंगाना घातला आणि दहशत निर्माण केली. कर्मचार्यांच्या तोडफोडीने कार्यालय विद्रुप झाले आहे. शासनाचे आर्थिक नुकसान झत्तल आहे. इंटरनेटची वायर तुटल्याने आॅनलाईन कामे बंद पडली तर विद्युत वाहक तारा तुटल्याने काही कक्षांचा विज पूरवठा खंडीत होऊन काम बंद झाले. कार्यालयामध्ये दहशतीचे वातावरण पसरुन महीला कर्मचारी घाबरुन बाहेर पळाल्या.
या प्रकरणी तातडीने संबंधित कर्मचार्यांना निलंबित करुन, त्याचे वर सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच दहशत माजविल्याचा, गोंधळ घातल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भद्रे यांनी केली आहे