Breaking News

कुकडी आवर्तनासंदर्भात मुख्यमंत्र्याना भेटणार - पाचपुते

 श्रीगोंदा । प्रतिनिधी । 28 - कुकडीचे आर्वतन 10 एप्रिलपासून सोडण्यात येणार आहे. मात्र, श्रीगोंद्यातील आवघ्या सातच बंधार्‍यांत पाणी सोडण्यात येणार आहे. हे अवर्तन श्रीगोंद्यातील 65 बंधार्‍यात सोडावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नुकतीच पत्रकारांना दिली.
ते पुढे म्हणाले की, आपण पालकमंत्री असताना कुकडीच्या टंचाई आवर्तनासाठी सव्वा दोन टीएमसी पाणी सोडले. त्यावेळी श्रीगोंद्यातील 65 बंधार्‍यांत पाणी सोडले तसेच काही फळबागानांही पाणी दिले होते. आता सव्वा दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार मात्र, श्रीगोंदयातील सातच बंधार्‍यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी तालुक्यात 32 लाख मेट्रिक टन ऊस होता. आता हा ऊस 14 लाख मेट्रिक टनवर आला आहे. मग वाळवंट कुणाच्या काळात झाले. याला जबाबदार कोण असा सावालही त्यानी केला. भीमा नदीवरील चार बंधार्‍यांत पाणी सोडण्यासाठी नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रस्ताव तयार केला आहे. पाठपुरावा केल्याशिवाय हा प्रश्‍न सुटणार नाही. श्रीगोंदा नळपाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम पुर्ण झाले असून पाईपलाईनची चाचणीही यशस्वी झाली आहे. मात्र विरोधकांना योजनेचा जॅकवेल कुठे आहे हे माहित आहे का ? असा टोला त्यांनी लगावला.