महाराष्ट्रातील वृद्धाश्रम संपतील, तोच खरा भाग्याचा दिवस
जामखेड। प्रतिनिधी । 26 - जगाच्या पाठीवर अनेक देश श्रीमंत असतील मात्र संस्कृतीने फक्त भारत भुमिच आहे.संन्याशाच्या सर्वच पाया पडतात मात्र संन्याशाला सुध्दा जिच्या पायावर डोके ठेवावे लागते ती म्हणजे आई म्हणून ज्या दिवशी महाराष्ट्रातील वृध्दाआश्रम संपतील तोच खरा भाग्याचा दिवस असेल आसे भक्ती शक्ती महोत्सवातील रामकथेच्या माध्यमातून विचार पुष्प गुंफताना रामायणाचार्य ढोक महाराज यांनी सांगितले.
संसारात जीवन जगत आसताना वडील म्हणतात कीती कमवलं, मुलगा म्हणतो कीती आणलं, पत्नी म्हणते कीती वाचवलं, मात्र आई विचारते काही पोटाला खाल्लं का? म्हणुन जगात फक्त माया आसते ती आई मध्ये. जगात सर्वात श्रेष्ठ कोण आसेल तर ती आई आसते.भरत प्रभुंना वनात भेटण्यासाठी चतुररंगी सेना घेऊन गेला तेव्हा राम व लक्ष्मणाने पाहीले तेव्हा राम म्हणतात सत्ता घेऊन अर्पण भावनेने आला तर लक्ष्मण म्हणतात सत्ता घेण्यासाठी सैन्य घेऊन आला. द्रुष्टीकोना मध्ये फरक सांगितला आहे. म्हणून राम कथा श्रेष्ठ आहे. भरत ने राज गादीचा त्याग केला. बंधू प्रेम व त्याग भरत कडून शिकावा, प्रभु रामचंद्रांनी चित्रकुट पर्वतावर 13 वर्ष निवास केला. त्या काळात आयोध्देशी संबध आला म्हणून आयोध्दा कांड झले.
गेल्या सहा दिवसान पासुन जामखेड येथे भक्ती शक्ती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तसेच आज सकाळी 9 वा शिवजयंती निमीत्त शिवचरीत्र व्याख्याते धर्मराज महाराज हांडे यांचे कीर्तन होणार आहे. 11 वाजता भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रामकथा समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले आहे. व दुपारी 3 ते 6 या वेळी शहरातून तुकोबारायांची व शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत हत्ती, उंट, घोडे असणार असुन या वेळी हत्ती वरुन साखर वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या वेळी वारकरी व धारकरी सह सर्व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास खास नगरसेवक पवनराजे राळेभात, डिगांबर चव्हाण, रुश्रीकेश बांबरसे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख मधुकर राळेभात, संदीप ठोंबरे, अभिजित निंबाळकर, पंकज ठोंबरे, अण्णा मांजरे, अभिमन्यू पवार, अमोल राळेभात, संतोष पवार, अशोक पोटफोडे, रघुनाथ मिसाळ, गोरख शिंदे, सागर पवार, यांच्या सह अनेक जण परीश्रम घेत आहेत.