Breaking News

पर्यावरणपूरक रंगपंचमीसाठी सामाजिक वनीकरणचे आवाहन

नाशिक/प्रतिनिधी। 27 - धुलवड व रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करुन पर्यावरण आणि आरोग्याचे रक्षण करावे असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. यावेळी प्लास्टीक फुगे, बॅगा, घातक रंगाचा वापर करण्याचे टाळावे. नैसर्गिक रंगाचा वापर करुन रंगपंचमी साजरी करावी. 
होळी या दिवशी झाडांची तोड होत असे पण आता पर्यावरण प्रेमी नागरीकांनी या दिवशी वृक्षलागवड करावी यासाठी विभागाच्या वतीने 1165 रोपांचे वाटप करण्यात आले. इंदिरानगर जॉगींग ट्रॅक, गोल्फ क्लब मैदान येथे रोपे वाटप करण्यात आले. यावेळी विभागाचे उपसंचालक आर.एम.सानप, सहायक संचालक के.बी. शिंदे, लागवड अधिकारी पी.व्ही. जाधव, वाय.पी. सातपुते उपस्थित होते.
विभागाच्या वतीने 22 मार्चला जागतिक जलदिनानिमित्त प्रभात फेरी, काढण्यात आली होती. यामध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटी विद्यालयाच्या मुख्याध्यापका श्रीमती शेलार, शिक्षक, विद्यार्थी, सामजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.