कास तलावात साडेबारा फूट पाणी
सातारा, 27 - सातारा शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करणार्या कास तलावाच्या पाणी पातळीत कमालीची घट होत चालली आहे. सद्या तलावात साडेबारा फुट पाणीसाठा शिल्लक राहिला काटकसरी पाणी वापरल्यास पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल.
कास तलावात 25 फुटांपयर्ंत पाणीसाठा होतो. गतवर्षी एप्रिल महिन्यात तलावात साडेदहा फूट पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मार्चमध्येच साडेबारा फुटांवर आली आहे. शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्याला दिवसाला एक इंच पाणीपातळी खाली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या एक फूट पाणीसाठा तलावात शिल्लक असला तरी वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस तलावातील पाणीपातळी खालावत चालली आहे. हा पाणीसाठा पावसाळ्यापयर्ंत टिकून रहावा यासाठी तलावातून वाया जाणारे पाणी मोटारीने पाटात सोडले जात आहे. महिन्यात दुसरा वॉल्व्ह उघडा पडण्याची शक्यता आहे. कास तलावातून सातारा शहराकडे पाणी येत असता बर्याच ठिकाणी एअर व्हॉल्व्हला गळती लागली असून त्यामधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.