यंदा मान्सून तीन जूनलाच धडकणार
मुंबई, 25 - यंदा पावसाचे आगमन चार दिवस आधीच म्हणजे 3 जून रोजी होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदा मान्सून केरळात 26 ते 27 मे दरम्यान येईल तर कोकणात 28 ते 29 मे दरम्यान दाखल होण्याचा अंदाज आहे.
सध्या मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तापमानवाढ दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांतील ही मोठी तापमानवाढ असून मान्सूनच्या पथ्यावर पडणारी आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये राज्यातले तापमान 1.5 ते 1.6 अंशांनी वाढले आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होईल. दरम्यान येत्या 27 आणि 28 मार्च रोजी विदर्भात गारपीटीसह पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.