Breaking News

आ.जगताप यांच्या पाठपुराव्याने अहमदनगर ते आळंदी बस सेवेचा शुभारंभ

 अहमदनगर । प्रतिनिधी । 26 - परिवहन विभागाच्या वतीने तारकपूर बस स्थानक येथून सुरु करण्यात आलेल्या अहमदनगर ते आळंदी बस सेवेचा शुभारंभ ज्ञानबा, तुकाच्या जयघोषाने शुक्रवार दि.25 मार्च रोजी झाला. आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने सुरु झालेल्या बस सेवेचा शुभारंभ सकाळी 7:30 वा. ह.भ.प. भागवत महाराज दळवी यांच्या हस्ते झाला. 
यावेळी माजी नगरसेवक ज्ञानदेव पांडूळे, वाहतुक नियंत्रक अमोल सुर्यवंशी, अनिल साळूंके, विजयराव बेरड, प्रमोद जाधव, शिवाजी लंके, सुमित मुनोत, नितीन कासवा, बाबूराव साळुंके, सुभाष भंडारी, शेखर भंडारी, राकेश गांधी, ईश्‍वर तोडकर, अमोल मैड, सतीष बोडखे, कामगार संघटनेचे अरुण दळवी, कामगार नेते मनोज सुगंधी आदीसह भाविक उपस्थित होते. आळंदीसाठी एस.टी.ची खास बस सेवा सुरु करण्यात आल्याने याचा लाभ भाविकांना मिळणार आहे. यापूर्वी आळंदीसाठी नगरहून बससेवा नसल्याने भाविकांना गाडी बदलत जावे लागायचे. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय व्हायची. 
आळंदीला जाण्यासाठी भाविकांनी केलेल्या मागणीने व आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने सदर बस सेवा सुरु करण्यात आल्याचे ज्ञानदेव पांडूळे यांनी सांगितले.
तारकपूर येथून रोज सकाळी 7:30 व दुपारी 2:30 वाजता आळंदीसाठी बस सुटणार असून, भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वाहतुक नियंत्रक अमोल सुर्यवंशी यांनी केले आहे. तारकपूर बस स्थानक येथून सुरु करण्यात आलेल्या अहमदनगर ते आळंदी बस सेवेचा शुभारंभ करताना ह.भ.प. भागवत महाराज दळवी समवेत नगरसेवक ज्ञानदेव पांडूळे, वाहतुक नियंत्रक अमोल सुर्यवंशी, अनिल साळूंके, विजयराव बेरड, प्रमोद जाधव, शिवाजी लंके, सुमित मुनोत, नितीन कासवा, बाबूराव साळुंके, सुभाष भंडारी आदी उपस्थित होते.