14 एप्रिल भूमीगुंठा दिवस जाहीर
अहमदनगर । प्रतिनिधी । 26 - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने गुरुवार दि.14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी भूमीगुंठा दिवस जाहिर करण्यात आला आहे
. डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करुन, त्यांची प्रतिमा असलेल्या पालखिची मिरवणुक काढणार
आहे. यामध्ये सुमारे 4 ते 5 हजार बेघर सहभागी होणार आहे. सरकारी जमीनीवरील सर्वसामान्यांचे असलेले घरांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याचा धाडसी निर्णय घेणारे महसुलमंत्री एकनाथ खडसे यांना वंचितांचे कैवारी महाराष्ट्र सन्मान पदवी बहाल केली जाणार असल्याची माहिती अॅड.कारभारी गवळी यांनी दिली.
वंचितांचे जीवन उंचवण्यासाठी व त्यांना सामाजिक दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच प्रयत्न केले. स्वातंत्र्याच्या 68 वर्षा नंतर देखील डॉ.बाबासाहेबांनी वंचितांसाठी पाहिलेले स्वप्न पुर्ण झाले नाही. भूमीगुंठेने बेघरांचा निवार्याच्या प्रश्ना बरोबर रोजी-रोटीचा प्रश्न मिटून, गरिबी दूर होऊन बाबासाहेबांचे खरे स्वप्न साकार होणार आहे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी महसुलमंत्री खडसे यांनी घेतलेला निर्णय हा अतिशय क्रांतिकारक व धाडसी असून याची इतिहासात नोंद होणार आहे. त्यां निर्णयाचे स्वागत करुन त्यांना सदर पदवीने सन्माणित करण्यात येणार असल्याचे अॅड.गवळी यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
सरकारी जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण असलेली गरीबांची घरे दंडात्मक रक्कम भरुन त्यांच्या नांवावर होणार आहे. वसंतराव नाईक यांनी जलसंधारणाचा, वसंतदादा पाटील यांनी खासगी शैक्षणिक विनाअनुदानीत संस्था उभारण्याचा व अंतुले यांनी जिल्हा विभाजनाचा धाडसी निर्णय घेतला होता ज्याची इतिहास नोंद झाली आहे. याचबरोबरीचा खडसे यांनी निर्णय घेऊन गरिबांना आनंदाची बातमी दिली आहे.