Breaking News

नगर पालिका हिस्स्या अभावी खडकपूर्णा योजना रखडली- आ. सपकाळ

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 26 - बुलडाणा शहरासाठी खडकपुर्णा धरणातून मंजूर करण्या्त आलेली सुमारे 83 कोटीची पाणी पुरवठा योजना ही, नगर परिषदेने त्यांच्या  हिस्या चा निधी न भरल्यामुळे रखडल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत दिली. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा शहर पाणी पुरवठा योजनेच्यां अनुषंगाने उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्‍न क्रमांक 49213 च्या लेखी उत्तरात ही माहिती देण्याात आली आहे.
        महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथ्थान महा अभियानांतर्गत बुलडाणा शहरासाठी खडकपुर्णा धरणातून पाणी पुरवठा करण्याच्या 82 कोटी 77 लाख रूपयांच्या योजनेस सन 2012 मध्ये मंजूरी प्रदान करण्यात आली होती. तब्बल चार वर्ष उलटल्या नंतर देखील सदर योजनेचे काम पुर्ण करण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत बुलडाणा शहरास तीन ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जातो. नगर परिषदेने चालु वित्तीय वर्षापासून पाणी पट्टीकरात दुप्पटीने वाढ केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. या पार्श्‍वरभुमिवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा शहर पाणी पुरवठा योजनेबाबत विधान सभेत तारांकीत प्रश्‍न उपस्थित केला होता.
        सदर प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सदर योजनेसाठी शासनाकडून 33 कोटी 10 लक्ष निधी वितरीत केल्याचे सांगितले. तसेच नगर परिषदेने प्राप्त निधीच्याी प्रमाणात सदर योजनेच्या पहिल्या टप्प्यांत आपल्या  हिस्स्याचा  8 कोटी 27 लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते. मात्र सदर हिस्सा् न भरल्यामुळे शासनाकडून निधीचा दुसरा हप्ता देता आला नसल्याची बाब मुख्यगमंत्र्यांनी स्पष्ट केली.
        या संदर्भात आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी  बुलडाणा नगर परिषदच्या अनागोंदी प्रशासकीय कारभारामुळे नागरीकांना भेडसावत असलेल्या  कृत्रीम पाणी टंचाईच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईच्या समक्ष मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.