Breaking News

ग्रामस्थांकडून श्‍वेताताई महाले यांचा सत्कार

 अमडापूर (प्रतिनिधी) । 26 - अमडापूर येथील बसस्थानकासाठी 50 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करून आणल्या बद्दल अमडापूर भाजपाच्यावतीने श्‍वेताताई महाले पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
अमडापूर येथे 20 मार्च रोजी आयोजित या सत्कार सोहळयच्या अध्यक्षस्थानी कमलबाई वानखेडे होत्या तर प्रमुख उपस्थितीत जि.प. सदस्य शाम पठाडे, नरहरी गवई, विकास डाळीमकर, सरपंच ललीता माळोदे, दिलीप खंदलकर, माधवराव देशमुख, ग्रा.प.सदस्य हमीदाबी, अशंकुराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जि.प.सदसय शाम पठाडे व नरहरी गवई यांनी श्ेवताताईं यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. भविष्यातही विविध विकासकामे आणून जनतेच्या सेवेसाठी कटीबध्द असल्याची ग्वाही सत्काराला उत्तर देतांना महाले यांनी दिली. प्रास्ताविक माधव धुंदळे यांनी केले. प्रसंगी बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक विकास डाळीमकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच शाहीद पटेल, बंडू माळोदे, डिगांबर राऊत, अशोक पाटील, प्रविण खंडेलवाल, विकास मोरे, गजानन देशमुख, नंदू जुमडे, याशीर पटेल, राम देशमुख, प्रशांत पाखरे यांची उपस्थिती होती.