सातारा-जावली मतदार संघातील रस्त्यांसाठी 7.16 कोटी
सातारा/ प्रतिनिधी। 25 - सातारा-जावली मतदारसंघातील सातारा शहर, सातारा व जावली ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरण व पुलांच्या बांधकामांना शासनाच्या सन 2016-17 च्या अर्थसंकल्पात 7 कोटी 16 लाख 68 हजार रुपयांची मंजूरी मिळाली आहे तर, यापुर्वीच्या मंजूर कामांसाठी अर्थसंकल्पात 10 कोटी 85 लाख 64 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सातारा शहरातून जाणार्या प्रमुख राज्य मार्गांचे चौपदरीक
रण, पुलांचे बांधकाम व सातारा शहरासह सातारा-जावली मतदारसंघातील ग्रामीण भागातीलही विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 7 कोटी 16 लाख 68 हजार रुपयांची मंजूरी मिळाली आहे.
अर्थसंकल्पामध्ये नवीन मंजूर झालेल्या कामांमध्ये सातारा तालुक्यातील महाबळेश्वर, सातारा, रहिमतपूर, विटा रस्ता रा. मा. 140 किमी भाग गोडोली ते अजंठा चौक रस्त्याची सुधारणा करणे 1 कोटी, लिंब खिंड, खिंडवाडी रस्ता प्रजिमा 30 रामनगर ते वेण्णानदी पूलापर्यंत रस्त्याची सुधारणा 30 लाख, लिंब खिंड ते खिंडवाडी रस्ता भाग गोडोली ते शिवराज पेट्रोल पंप रस्त्याची सुधारणा करणे 1 कोटी, कास बामणोली रस्ता प्रजिमा 26 आटाळी फाटा ते घाटाई देवी फाटा रस्ता सुधारणा करण्यासाठी 33 लाख 68 हजार रुपयांची मंजूरी मिळाली आहे.
जावली तालुक्यातील महाबळेश्वर, सातारा, रहिमतपूर विटा रस्ता रा. मा. 140 मध्ये मेढा गावातील रस्त्याचे रुंदीकरण करणे 1 कोटी 30 लाख, जोर पाववड, वाई, मेढा रस्ता प्रजिमा 19 भाग आलेवाडी ते मार्ली खिंड रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे 60 लाख, भिलार, उंबरी, धावली, आलेवाडी खिंड, रेंगडी मुरा, कुंभारगणी, मोरखिंड, जननीमाता मंदीर, मोरावळे ते रा.मा. 140 रस्ता प्रजिमा 68 भाग जावली तालुका हद्द ते सायघर फाटा रस्त्याचे मजबुतीकरण करणे 1 कोटी 50 लाख, याच मार्गावरील भाग पदमलेमुरा ते रेंगडीमुरा, कुंभारगणी रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी 1 कोटी 9 लाख 77 हजार या कामांचा समावेश आहे.