Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती स्थापन

 अहमदनगर । प्रतिनिधी । 26 - नगर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायांनी राजकीय व सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर  125 वा जयंती महोत्सव समितीची स्थापना केली असून समितीच्या अध्यक्षपदी परिमल निकम यांची निवड केली आहे. 
शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटना या जयंतीनिमित्त एकत्र आल्या आहेत. 14 एप्रिल रोजी शहरातून एकच मिरवणूक काढणार आहे. अशी माहिती समितीचे मार्गदर्शक अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. अधिक माहिती देतांना ते म्हणाले, 14 एप्रिल रोजी समता रथ आंबेडकरी जनतेचा राहणार असून आंबेडकरी चळवळीच्या एकात्मतेचे प्रतिबिंब मिरवणुकीमध्ये दिसणार आहे. मिवणूक सायंकाळी 4 वाजता मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघून रात्री 12 वाजता सिध्दीबागेतील भगवान गौतम बुध्दांना अभिवादन करुन विसर्जित केली जाणार आहे. या मिरवणुकीत झांज व लेझिम पथक तसेच पारंपारित वाद्य यासह सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांना विशेष ड्रेसकोड राहणार आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सामुदायिक भीमवंदना दिली जाणार आहे. यावेळी 125 विद्यार्थी भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन करणार आहेत. याचवेळी 125 कार्यकर्त्यांचा सत्कारही केला जाणार आहे. 
या कार्यक्रमासाठी आ. संग्राम जगताप, खा. दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंजुषा गुंड, महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, मनपा आयुक्त विलास ढगे, समाजकल्याण अधिकारी वाघ, भोगले यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. समितीचे अध्यक्ष परिमल निकम म्हणाले, मिरवणुकीनिमित्त काढण्यात येणार्‍या समता रथावर समांनतेचा संदेश देणारे घोषवाक्य राहणार आहे. या जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहे. आंबेडकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जयंती साजरी करण्याची भुमिका , चांगला विचार व चांगला पायंडा पाडला आहे. असे सांगितले. 
यावेळी महोत्सव समिती जाहिर करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक अशोक गायकवाड, अध्यक्ष परिमल निकम, कार्याध्यक्ष डॉ. सोनवणे, डॉ. प्रदिप तुपे, उपाध्यक्ष सुमेध गायकवाड, सुजित घंघाळे, बंडू आव्हाड, राजु दाभाडे, विशाल गायकवाड, सुनिल साळवे, आकाश सरोदे, विशाल विशाल विठ्ठल गायकवाड, सरचिटणीस प्रा. डॉ. रत्नाताई वाघमारे, चिटणीस नितीन कसबेकर, सुजय म्हस्के, कौशल गायकवाड, वैभव कांबळे, खजिनदार महेंद्र राजगुरू, प्रसिध्दी प्रमुख महेश भोसले, संजय कांबळे, प्रा.पत्रकार सुभाष चिंधे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. संतोष गायकवाड, संयोजन समिती सदस्यपदी अजय साळवे, सुनिल क्षेत्रे, सुनिल शिंदे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा.विलास साठे, सुशांत म्हस्के, विजय भांबळ, सुरेश वाघचौरे, सौ. जया गायकवाड, शिरीष जाधव, सौ. संध्या मेढे, संजय जगताप, किरण दाभाडे, किरण गायकवाड, चंद्रकांत भिंगारदिवे, वंसत मेढे यांचा समावेश आहे.