पाणी टंचाई निवारनार्थ नळ योजनांची विशेष दुरूस्ती
बुलडाणा, 20 - पाणीटंचाई निवारणार्थ बुलडाणा तालुक्यातील रायपूर, चांडोळ, गिरडा व चौथा गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे.
तसेच दे.राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी तात्पुरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या गावांमध्ये कामे सुरू होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांनी केल्यानंतरच संबंधितास देयकाची अदायगी करण्यात यावी. तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी विद्युत जोडणी उपलब्ध करावी. तसेच ही योजना किमान तीन वर्ष कार्यरत राहील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.