Breaking News

सेवारत व माजी सैनिकांच्या पाल्यांना मोफत वैद्यकीय सेवा

बुलडाणा, 20 - जिल्ह्यातील सर्व सेवारत सैनिक, माजी सैनिक, युद्ध विधवा व त्यांचे अवलंबित यांच्या 18 वर्ष पर्यंतच्या वयोगटातील पाल्यांना डॉ. एस.एस गुर्जर यांच्या लहान मुलांच्या दवाखाना, जांभरून रोड येथे मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. तसेच आंतर रूग्ण सेवेमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. औषधांचा खर्च रूग्णांच्या पालकांना करावा लागणार आहे. 
ही सुविधा सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. तसेच 2016-17 वर्षासाठी ही सेवा मयार्दीत असून सुविधेचा लाभ घेण्यासाठी येताना माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे ओळखपत्र सोबत आणावे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.