जखमी शेतकर्यांवर सिव्हीलमध्ये उपचार
अहमदनगर । प्रतिनिधी । 23 - वन प्राण्याच्या हल्ल्यात पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील शेतकर्याला जखमी केले. रावसाहेब पाटीलबा वाबळे (वय 64) असे जखमी झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रावसाहेब वाबळे हे सकाळी आठ वाजता त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतात मका आणण्यासाठी गेले होते. रावसाहेब यांच्या दिशेने एक वन्य प्राणी पुढे आला. रावसाहेब यांना पाहून त्याने डरकाळी फोडली. या डरकाळीने रावसाहेब काहीसे मागे गेले. हातपाय कापू लागले. त्यांचा घसा कोरडा पडला. त्या प्राण्याने काही क्षणात त्यांच्यावर झेप घेतली. रावसाहेब यांनी प्रसंगावधान राखत त्यांच्या दिशेने प्राण्याची
येणारी उडी खाली वाकून हुकवली. तरी देखील त्या प्राण्याने पुढचे पंजे त्यांच्या डोक्याला मारले. रावसाहेब यांच्या डोक्याला यामुळे जखम झाली. त्या वन्य प्राण्याने पुन्हा वळून रावसाहेब यांच्यावर हल्ला केला. यावेळी रावसाहेब यांनी मक्याची पेंढी मानेजवळ घेतली होती. त्याचवेळी प्राण्याने पुन्हा समोरून हल्ला केला. यावेळी रावसाहेब व हल्लेखोर प्राणी दोघेही जमिनीवर पडले. रावसाहाबे यांचा डावा हाताला त्या प्राण्याने चावा घेतला. त्याचक्षणी रावसाहेब यांनी त्या प्राण्याच्या पोटात लाथ मारली. त्यामुळे तो प्राणी त्यांच्यापासून लांब जाऊन पडला. यावेळी त्या प्राण्याने पुन्हा डरकाळी फोडून पळ काढला. जखमी रावसाहेब यांनी स्वत:ला सावरत मदतीसाठी आजूबाजूला पाहिले. लांब वस्तीवर लोक दिसत होते.