Breaking News

पोलिस क्रेडिट सोसायटीवर ओम साईनाथ पॅनलचे वर्चस्व

 अहमदनगर । प्रतिनिधी । 23 -  जिल्हा पोलीस खाते कर्मचारी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या चुरशीच्या निवडणुकीत पोलीस कर्मचारी संजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखालील ओम साईनाथ पॅनलने विजय मिळविला. पंधराही जागांवर या पॅनलच्या उमेदवारांनी यश मिळविले. सोसायटीच्या निवडणुकीसाठी ओम साईनाथ पॅनल, परिवर्तन पॅनल व तीन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. 
सोसयाटीसाठी रविवारी सायंकाळी मतदान होऊन लगेच मतमोजणी झाली. 32.65 टक्के मतदान झाले. सत्ताधारी ओम साईनाथ पॅनलच्या उमेदवारांनी सुरूवातीपासून मतमोजणीत आघाडी घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निकाल जाहीर करताच ओम साईनाथ पॅनलच्या उमेदवारांनी व सर्मथकांनी जल्लोष केला. य्विजय उमेदवार : दिनेश मोरे, राजू सुद्रीक, शंकर बहिरट, अविनाश वाघचौरे, सुमन दिघोळे, लक्ष्मण खोकले, राजू वैरागर, ज्योती रणदिवे, बाळासाहेब कनकरे व प्रसाद आळकुटे (सर्वसाधारण मतदार संघ), सचिन शिरसाठ (अनुसूचित जाती-जमाती), अंजली बर्डे व दीप आठवले (महिला राखीव), अशोक गाडीलकर (इतर मागासवर्ग) व सतिष भांड (भटक्या विमुक्त व जाती-जमाती).सोसायटीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपली तयारी होती. सभासदांचा कल देखील तसाच होता. मतदान नको म्हणून काही सभासदांनी 
विरोधकांची  समजूत देखील काढली होती. पण विरोधकांनी  निवडणूक लादली. सभासदांनी विश्‍वास  ठेवून पुन्हा एकदा सत्ताधार्‍यांना संधी दिली आहे. त्यामुळे सभासदांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय चोरडिया यांनी दिली.