Breaking News

रिंगिंग बेल्सविरोधात बीपीओ कंपनीची पोलीस ठाण्यात तक्रार

 नवी दिल्ली/प्रतिनिधी । 28 - सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा केलेल्या रिंगिंग बेल्स कंपनीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नोएडामधील सायफ्यूचर या बीपीओने ही तक्रार केली असून 80 लाख रुपयांची नुकसानभरपाईदेखील मागितली आहे. सायफ्यूचरने तक्रारीत फसवणुकीचा आणि 80 लाखाहून जास्त थकबाकी ठेवल्याचा आरोप केला आहे. गौतम बुद्ध नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सायफ्यूचर बदनामीचीदेखील तक्रार दाखल करणार आहे ज्यामध्ये करोडोंचा दावा रिंगिंग बेल्स कंपनीवर ठोकणार आहे. बाजारात कंपनीची प्रतिमा खराब केल्याचा आरोप  सायफ्यूचरचे संस्थापक आणि सीईओ अनुज बैराठी यांनी केला आहे. रिंगिंग बेल्सचे व्यवस्थापकीय संपादक मोहीत गोयल यांनी सायफ्यूचर पोलीस तक्रार आणि कायदेशीर बाबी करुन धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. रिंगिंग बेल्सने 16 फेब्रुवारीला सायफ्यूचरसोबत करार केला होता ज्यामध्ये पहिल्या आठवड्यात 7.5 लाखांची रक्कम देण्यात आली होती. मात्र 24 फेब्रुवारीला रिंगिंग बेल्सने अचानक करार रद्द केला. ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात येणारे फोन सायफ्यूचर व्यवस्थितरित्या हाताळू शकत नसल्याने 
आम्ही करार रद्द करत असल्याचं रिंगिंग बेल्सना सांगितले होते.