स्मृती इराणी संसदेत खोटे बोलल्या ; रोहितच्या कुटुंबीयांचा आरोप
नवी दिल्ली - हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी संसदेमध्ये दिलेले स्पष्टीकरण खरे नसून, त्या खोटे बोलल्या आहेत, असा गंभीर आरोप रोहितच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला.
रोहितसहित तीन विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले होते. ज्या दिवशी रोहितचा मृत्यू झाला त्या दिवशी पोलिस आणि डॉक्टरांना त्याच्या खोलीमध्ये जाऊ दिले गेले नाही. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करता आला असता; पण याबाबत जाणीवपूर्वक खोटी माहिती प्रसारित करण्यात आली, असा आरोप रोहितच्या कुटुंबीयांनी केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितची आई राधिका आणि भाऊ राजा हे दोघे सहभागी झाले होते.

विद्यापीठाच्या डॉक्टरांनी सायंकाळी सातच्या सुमारास रोहितला मृत घोषित केले होते. याबाबत त्यांनी 25 जानेवारी रोजी समोर येऊन वक्तव्यही केले होते. जोपर्यंत आपण घटनास्थळी पोचलो तेव्हा रोहितचा मृत्यू झाला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियात व्हारयल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या खोलीत रोहितने आत्महत्या केली होती, त्याच खोलीत एका बाजूस त्याचा मृतदेह आणि पोलिस स्पष्टपणे दिसत आहेत. ज्या विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने हा निर्णय घेतला, त्यामध्ये एकही दलित प्रतिनिधी नव्हता, असा दावा कुटुंबीयांनी केला. विद्यापीठाचे कुलगुरू आणि अध्यक्ष अप्पाराव यांना मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनीच नेमले असून, कार्यकारी समितीच्या अकरा सदस्यांमध्ये अनुसूचित जाती अथवा जमातीमधील एकही सदस्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.