ऑटोरिक्षा परवान्यासाठी इरादापत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन
नाशिक/प्रतिनिधी। 24 - नाशिक महानगरपालिका क्षेत्राकरिता 141 ऑटोरिक्षा परवान्यांचे वाटप करण्यासाठी ऑनलाईन लॉटरीच्या यशस्वी निवड यादीतील उमेदवारांनी कागदपत्राची पुर्तता करून इरादापत्र प्राप्त करून घ्यावयाचे आहे.
यशस्वी उमेदवारांपैकी 1 ते 50 क्रमांकाच्या उमेदवारांनी 1 मार्च रोजी दुपारी 12 वाजता, 51 ते 100 क्रमांकाच्या उमेदवारांनी 2 मार्च रोजी दुपारी 12 वाजता आणि 101 ते 141 क्रमांकाच्या उमेदवारांनी 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित राहून कागदपत्रांची पुर्तता करावी. अनुपस्थित उमेदवारांनी 4 मार्च 2016 पूर्वी कागदपत्रांची पुर्तता करावी.
नमुना अर्जासोबत तीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, वैध अनुज्ञप्ती, प्रवासी ऑटोरिक्षा चालिवण्याचा बॅच, पत्त्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, मागील एक वर्षात कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद नसल्याचा पोलीस विभागाचा दाखला, कायमस्वरुपी नोकरीत नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, अर्जदाराच्या नावे कोणतेही ऑटोरिक्षा किँवा टॅक्सी परवाना नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, शुल्क प्रदान केल्याची पावतीची प्रिंट सोबत सादर करावी.
मराठी भाषेची मौखीक चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील. पत्त्याचा पुरावा आणि अधिवास प्रमाणपत्राच्या पुर्ततेनंतरच परवाना जारी केला जाईल. यशस्वी अर्जदारास परवाना शुल्क एक हजार रुपये भरावे लागतील. तसेच शासनाने निर्धारीत केल्यानुसा अतिरिक्त परवाना शुल्क रुपये 10 हजार भरणे बंधनकारक राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.