Breaking News

विशाखा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुक्त विद्यापीठाचे आवाहन

नाशिक/प्रतिनिधी। 24 - नवोदित कविंना प्रोत्साहन देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या गौरवार्थ, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या विशाखा या काव्यसंग्रहाच्या नावाने विशाखा काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. विशाखा काव्य पुरस्कार-2015   पुरस्कारासाठी कविंनी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी पुरस्कारांची निवड केली जाईल. रु.,21000/-, रु.15000/- व रु. 10,000/- (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय) सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी नवोदित कवी किँवा त्यांच्या प्रकाशकांनी 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 या काळात प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाच्या पाच प्रती दि.  31 मार्च 2016 पूर्वी डॉ. विजया पाटील, संचालक, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  422222  या पत्यावर पाठवाव्यात असे आवाहन मुक्त विद्यापीठाने केले आहे. 
पुरस्कारासाठी पाठविण्यात येणारा काव्यसंग्रह हा संबंधित कवीचा पहिलाच प्रकाशित काव्यसंग्रह असावा आणि हा आपला पहिलाच प्रकाशित काव्यसंग्रह असल्याचे प्रतिज्ञापत्र कवीने काव्यसंग्रहाबरोबर पाठविणे बंधनकारक आहे. पुरस्कारासाठी पाठविण्यात आलेले काव्यसंग्रह परत पाठविण्यात येणार नाहीत. हस्तलिखित किँवा कात्रणे पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी 0253-2230127 किंवा 9422247291 या 
भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा .