Breaking News

उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य पोलिसांना शरण

नवी दिल्ली, 24  - देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य जेएनयूमधील हे दोन विद्यार्थी मंगळवारी मध्यरात्री दिल्ली पोलिसांना शरण आले. दिल्ली उच्च न्यायालयाने दोघांचेही अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पोलिसांना शरण जाण्याचा मार्ग स्वीकारला. 
एका कारमधून उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना जेएनयू कॅम्पसमधून बाहेर आणलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने दोघांना ताब्यात घेऊन त्यांना वसंत विहार पोलिस्ट स्टेशनमध्ये घेऊन गेले. या दोघांना भारतीय दंडविधान कलम 124 अ अंतर्गत ताब्यात घेण्यात आल्याचे सहपोलिस आयुक्त आरएस कृष्णय्य यांनी सांगितलं.दरम्यान, आशुतोष कुमार, रामा नागा, अनंत प्रकाश हे तीन विद्यार्थी अद्याप शरण आलेले नाहीत.
शरण आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोघांनाही अज्ञात स्थळी हलवले आहे. आज दोघांनाही कोर्टात  हजर केले जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या पोलिस ठाण्याबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार तसेच उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.