संत रोहीदास महाराजांची 639वी जयंती उत्साहात
अहमदनगर । प्रतिनिधी । 23 - संत रोहीदास महाराजांची 639 वी जयंती अहमदनगर जिल्हा चर्मकार समाज बांधवांच्यावतीने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अशोक कानडे तर प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब कानडे, माणिकराव नवसुपे, विजय घासे, निलेश बांगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष सुनिल केदारे, गौतम सातपुते, भिकाजी वाघ, रावसाहेब देव्हारे, गोपीनाथ म्हस्के, आदीनाथ खरात, हरीचंद्र देसाई, माणिक लव्हाळे, बाबुलाल शिंगरे, कैलास घेवरे, संतोष बांगरे, गणेश घेवरे, साईनाथ वडोदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत रोहीदास महाराजांच्या प्रतिमेचे पुजनाने झाली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. अशोक कानडे म्हणाले की, क्रांतीकारी संत रोहीदास महाराज केवळ जन्माने चर्मकार समाजाचे असले तरी, ते संपुर्ण मानव जातीचे मार्गदर्शक संत आहे.
त्यांना जातीच्या चार भिंतीत बंदिस्त करण्यापेक्षा त्यांचे विचार व कार्य संपुर्ण देशातील जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी चर्मकार समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत रोहीदास यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवता वादाचा व समतेचा विचार तळागाळापर्यंत पेरण्याचे जीवनभर कार्य केले.
हा आदर्श आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी असल्याचे सांगून, शहरात संत रोहीदास महाराजांच्या भव्य स्मारकासाठी शासनाच्या माध्यमातून भरीव निधी आनून भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.रावसाहेब कानडे म्हणाले की, संत रोहीदास महाराजांची जयंती उत्सव संपुर्ण राज्यात साजरा होत आहे. जयंती उत्सवाने संपुर्ण चर्मकार समाज जोडला गेला आहे. संत रोहीदास महाराजांच्या कृपा छत्राखाली समाज
एकत्र आल्याने समाजाला उन्नतीचा मार्ग सापडला आहे.पाहुण्यांचे स्वागत सुनिल केदारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन गौतम सातपुते यांनी केले.