Breaking News

बुलडाण्यात मोफत आरोग्य शिबिराचा समारोप

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 28 - सावता माळी समाज विकास, शैक्षणिक व बहुउद्देशिय मंडळ व एम.आय.टी हॉस्पीटल  अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टीट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचा  समारोप आज 24 फे्रबुवारी रोजी झाला. बुलडाणा तालुक्यासह परिसरातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विविध आजाराने ग्रस्त असलेले एकुण 625 स्त्री, पुरुष व बालकांनी या निशुल्क आरोेग्य शिबिराचा लाभ घेतला.
सावतामाळी समाज विकास, शैक्षणिक व बहुउद्देशिय मंडळ बुलडाणा  हॉलमध्ये संस्थेचे अध्यक्ष जालींधर बुधवत व संचालक भालचंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत एम.आय.टी. हॉस्पीटल अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टीटयुटच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुने रुग्णांची मोफत आरोग्य तपासनी केली. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा कॅन्सर, मुलांना जन्मतः व्यंग गुप्तरोगावरील समस्या, पोस्टेड ग्रंथी कॅन्सर, मनक्यांचे आजार, हातापायांना मुंग्या येणे, तोल सांभाळता न येणे, हाडांचे आजार, कमी एैकू येणे, शरिरावर गाठी, तोंडावरील आजार आदीं आजारांवर शिबिरात तपासणी  करुन औषधोपचार करण्यात आली. परंतु आजाराचे गांभिर्य लक्षात धेता गंभीर आजाराकरीता शस्त्रक्रियेसाठी आय.आय.टी. हॉस्पीटल अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टीट्युट येथे बोलविण्यात आले. त्यापैकी विविधा आजारातील पंचविस  गरजूंवर राजीव गांधी जीवनदायी योजनेतंर्गत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जालींधर बुधवत, संचालक भालचंद्र देशमुख, जि.प.विरोधी पक्षनेते अशोक इंगळे, विजय जाधव, नारायण हेलगे, जिल्हा दुध संघाचे संचालक राजु मुळे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल सोळंके यांचे हस्ते 65 गरजूंना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले व ऑडीओलॉजिस्ट योगेश पांडे व सहकारी योगेश घोरपडे यांनी उपकरण हाताळणी पध्दती व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती समजावून सांगितली.
स्वयंरोजगारासाठी तसेच स्त्री सबलीकरण व सक्षमीकरणाच्या हेतूने संपुर्ण जिल्हाभर मागेल त्याला प्रशिक्षण व हवे ते प्रशिक्षण त्यामध्ये तांत्रिक सुध्दा गावपातळीवर देण्याचे आश्‍वासन देत संस्था गेल्या आठ वर्षापासून सातत्याने ग्रामपातळीवर हेच कार्य करत असून आजपोवतो 25000 प्रशिक्षर्थीना विविध व्यवसाय प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला अहो, त्याच बरोबर प्रधानमंत्री जन धन योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सामान्य नागरिक व स्त्री-पुरुषांचे जवळपास चार हजार पाचशे खाते शुन्य बॅलेन्स बँकखाते उघडण्यात आले असून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेतंर्गत जवळपास 2 हजार पाचशे सामान्य नागरिकांचा जीवन सुरक्षा विमा उतरविण्यात आला आहे. संस्थेद्वारे प्रधानमंत्री जन-धन शिशु योजनेतंर्गत 250 लघुव्यवसायिकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून संबंधित लघुव्यवसायिकांचे कर्जाबाबचे प्रस्ताव संबंधित बँकेकडे पाठविण्यात संस्थेने हातभार लावला. अशा प्रकारे सामाजिक कार्यात संस्था सदा अग्रेसर असते. 
कार्यक्रमाचे संचालन अरुन देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्र नरवाडे यांनी केले. कार्यक्रमास 90 व्यक्तींनी उपस्थिती लावली असून कर्णबंधीरांसाठी 25 श्रवणयंत्र मोफत वाटप करण्यात आले. मोफत शस्त्रक्रियेसाठी व शिबीर आयोजनासाठी उपस्थितांनी संस्थेचे एम.आय.टी. चे आभार मानले. तर शिबिर यशस्वीतेसाठी सावतामाळी समाज विकास शैक्षणिक व बहुउद्देशिय मंडळातील कर्मचारी आयेशा शेख, अबोली गाभणे, गजानन अंभोरे, प्रमोद माळी, योगेश सुरडकर, योगेश पवार, राहुल तायडे, मधुकर वर्‍हाडे, समाधान पालकर यांनी परिश्रम घेतले.