Breaking News

अ.भा.म.पत्रकार परिषदेच्या अमरावती विभागीय सचिवपदी राजेंद्र काळे

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 28 -  पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अमरावती विभागीय सचिवपदी, बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांची  निवड परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी  आज शनिवार 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा गौरव दिनाच्या पर्वावर केली. पत्रकार परिषदेच्या 77 वर्षाच्या इतिहासात या निमित्ताने राज्य कार्यकारणीवर जाण्याचा बहुमान काळे यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्याला मिळाला आहे. 
मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी एस.एम. देशमुख यांची निवड झाल्यानंतर, संघटनात्मक बांधणीला वेग आला असुन. त्याअंतर्गतच विभागीय सचिवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात अमरावती विभागाच्या सचीवपदी राजेंद्र काळे यांची निवड, त्यांनी वर्षभरात बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून केलेल्या भरीव कामाची दखल म्हणून करण्यात आली आहे. या निवडीचे सर्वाधिकार परिषदेने विश्‍वस्त किरन नाईक, कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, सरचिटणीस यशवंत पवार व कोषाध्यक्ष मिलींद आष्टीकर यांना दिले होते. अमरावती विभागीय सचिवपदी निवड झालेले राजेंद्र काळे हे 20 वर्ष पत्रकारीतेचा त्यांना अनुभव आहे. आकशवाणी वार्तापत्राची जबाबदारीही त्यांच्यावर आली असून, या विभागीय निवडीचे श्रेय ते मराठी पत्रकार परिषद पदाधिकार्‍यांसह बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच पत्रकार बांधवांना देतात.