अनुसूचित जमाती कल्याण समिती पुणे दौर्यावर
पुणे (प्रतिनिधी)। 24 - अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या कामकाजास आजपासून येथे सुरवात झाली. समितीचे अध्यक्ष तथा आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये आमदार सर्वश्री वैभव पिचड, पास्कल धनारे, चंद्रकांत सोनवणे, संजय पुराम, नारायण कुचे, अशोक ऊईके, प्रभुदास भिलावेकर यांचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आजपासून समितीचे कामकाज सुरू झाले. तत्पुर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, आमदार सुरेश गोरे, आमदार जयदेव गायकवाड, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, अतिश परदेशी, मावळ तालुका पंचायत समितीच्या सभापती मंगल वाळुंजकर, जिल्हा परिषद सदस्य सविता गावडे, गुलाबराव वरघडे आदी लोकप्रतिनिधींनी समितीच्या सदस्यांशी विविध समस्यांबाबत चर्चा केली. त्याचबरोबर प्रश्नांबाबत आपले निवदेन सादर केले.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलीस अधीक्षक जय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, त्याचबरोबर विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. समितीच्या कामकाजास सुरवात होण्यापुर्वी जिल्हा परिषदेच्या वतीने अध्यक्ष प्रदीप कंद यांनी समितीच्या सर्व
सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.