टोळीयुद्धातून भरदिवसा एकावर वार
पुणे (प्रतिनिधी)। 24 - कोथरूड येथील पौड फाटा चौकाजवळ आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकले. यामध्ये पौड फाटा येथे दशभुजा गणपती मंडळाच्या अध्यक्षाचा कोयत्याने वार करण्यात आले.
सागर शिंदे (वय- 28, रा. केदारी एम्पायर, पौड फाटा, कोथरूड) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड फाटा चौकातील दशभुजा गणपती मंदिराजवळ आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सागर हा थांबला होता. यावेळी मोटारीतून आलेल्या चौघांनी सागर याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संदीपला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गुन्हेगारी वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. सागर शिंदे हा पौड फाटा येथील दशभुजा मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे.