डोंगरे क्रीडा क्षेत्रात उज्वल कामगिरी करतील ः भागवत
अहमदनगर । प्रतिनिधी । 08 - कु.प्रतिभा व कु. प्रियंका डोंगरे क्रीडा क्षेत्रात भविष्यात उज्वल कामगिरी करतील. ग्रामीण भागात खेळासाठी अपेक्षित सोईसुविधा नाहीत. मात्र परीस्थितीवर मात करुन जो खेळातो तोच मैदानात टिकतो असे मत आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केले.
न्यु आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज अ.नगर जीमखाना विभागाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलता होत्या. या कार्यक्रमात कु.प्रतिभा नाना डोंगरे, व कु.प्रियंका नाना डोंगरे या दोघींनी ज्युदो व कुस्ती या खेळामध्ये विशेष प्रविण्य मिळविल्याबद्दल त्यांचा आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.यावेळी आदर्श गाव प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी ग्रामीण भागामध्ये खेळाच्या सोई उपलब्ध केल्या पाहिजे, क्रीडा क्षेत्रातही करियर करता येते. मैदांनी खेळांना पालकांनी प्रोत्साहान दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे, माजी आमदार व संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे पा., कार्यक्रमाचे अध्यक्ष रा.ह.दरे, अॅड. सहसचिव दिपलक्ष्मी म्हसे मॅडम, अॅड. रामनाथ वाघ, चंद्रकांत म्हस्के, प्राचार्य बी.एच. झावरे, उपप्राचार्य आर.जी. कोल्हे, उपप्राचार्य गिते, सौ.जंगले मॅडम, क्रीडा संचालक डॉ.शरद मगर, क्रीडा संचालक सुधाकर सुंबे, प्रा. धन्यकुमार लाटे, प्रा.गणेश भगत आदी उपस्थित होते. या गौरवाबद्दल अॅड.महेश शिंदे, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, विजय मिसाळ, अॅड. भानुदास होले, रोहिदास गाढवे आदींनी कु.प्रतिभा व कु.प्रियंका डोंगरे यांचे अभिनंदन केले आहे.