स्वस्तातील औषध निर्मितीची गरज ः पाटील
अहमदनगर । प्रतिनिधी । 08 - आजच्या 21 वे शतक स्पर्धा आणि तंत्रज्ञानाचे आहे. जागतिकीकरणामुळे भविष्यात औषधे निर्मितीत मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. तरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गरीब कुटुंबांना परवडतील व आजार बरे होतील, अशी औषधे निर्माण करण्यासाठी संशोधन करावे, लागणार आहे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व परिक्रमा फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ’इनोव्हेशन इन टिचिंग अँड टिचर्स इन फार्मासिटीकल सायन्स या विषयावर विभागीय चर्चासत्र प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते.
पुढे बोलताना अनिल पाटील म्हणाले, परिक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औषधे निर्मितीच्या शिक्षणाची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करुन सर्वसामान्यांना परवडतील अशा औषधाची र्म्मिती करावी. भविष्यकाळ उज्ज्वल आहे. परंतु विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती कायम जोपासायला हवी.
बबनराव पाचपुते म्हणाले, विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून शिक्षण घेतल्यास निश्चितच समाजासाठी शिक्षणाचा वापर हा दृष्टिकोन सफल होईल. या चर्चासत्रात डॉ. विनोद पवार, डॉ.वर्धमान बाफना, विवेक रैदावते, डॉ. ए. एस. मुंदडा, डॉ.रवींद्र जायभाय यांनी औषध निर्मिती क्षेत्रातील बदल यावर विचार मांडले.
यावेळी परिक्रमाच्या अध्यक्ष प्रतिभा पाचपुते, प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के, डॉ. एस. एस. इथाले, डॉ. आर. बी. जाधवर, डॉ. वाय. एस. वैशंपायन, प्रा. सागर कदम, प्रा. मोहन घगारे आदी उपस्थित होते.