श्रीगोंद्यात पुन्हा ड्राप; यवतमाळच्या तरुणांना पाच लाखाला लुटले
श्रीगोंदा । प्रतिनिधी । 20 - स्वस्तात सोन्याच्या आमिषाने यवतमाळ येथील चार तरुणांना निमगाव खलु येथे पाच लाख रुपयाला लुटल्याची घटना आज सकाळी 9वाजेच्या दरम्यान घडली या घटनेत लुटले गेलेल्यात एका शिक्षकाचा हि समावेश आहे या घटनेबाबत पोलिसांनी 6जणांना ताब्यात घेतले आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि , श्रीगोंदा तालुक्यात स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लुटण्याच्या घटना वाढू लागल्या आहे या प्रकारामुळे श्रीगोंदा तालुका राज्यभर कुप्रसिद्ध झाले आहे गेल्या तीन दिवसापूर्वी बेलवंडी शिवारात नागपूरच्या एका व्यापार्याला सुमारे 45लाख रुपयाला लुटण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज निमगाव खलु मध्ये यवतमाळ येथील चार जणांना लुटण्यात आले याबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी सांगीतले बुधेशर पाईकराव वय 22 हा तरून पुणे ते दौंड रेल्वेने दोन महिन्यापूर्वी प्रवास करत असताना त्याला गुन्हेगारी क्षेत्रातील समाजातील बाळू नावाचा एक व्यक्ती भेटला व त्याने पाईकराव याला सोन्याची तार दिली व आमच्याकडे दोन किलो सोने आहे आम्हाला खोदकाम करताना सोने सापडले आहे ते सोने आम्ही पाच लाख रुपयात देवू असे सांगीतले त्यानंतर त्या बाळू नावाच्या व्यक्तीने पाईकराव यांना वारंवार फोनवरून सोने घेण्याची विनती केली त्यमुळे पाईकराव याने हि माहिती आपला मावसभाऊ आनंदकुमार तडसे रा ,उमरसरा जिल्हा यवतमाळ यांना या सोन्याची माहिती दिली त्यानुसार तड्से याने आपली पत्नी छाया तड्से हि शिक्षिका आहे तिला हकीगत सांगीतली व शिक्षिका असणार्या पत्नीने घराच्या बांधकामासाठी काढलेले 6लाख रुपयाचे कर्ज घेतले त्यातील 5लाख रुपये तड्से हा घेवून दि 18 रोजी
यवतमाळ वरून निघाला होता त्याच्या समवेत निलेश पाईकराव व नंदकुमार खरात व स्वतः बुधेस्वर पाईकराव हे चार जन निघाले होते व दि 19 च्या सकाळी नगर यथे पोहचले थेथून पहाटे पाच वाजता दौंड येथे आले.
त्याठिकाणी बाळू नावाचा व्यक्ती त्यांना घेण्यासाठी गेला त्याने या चार जणांना निमगाव खलु गावाच्या हद्दीत असणार्या उसाच्या शेतात नेले त्याठिकाणी असणार्या इतर महिलांनी वरील तरुणाच्या हातातील पाच लाखाची पैशाय्ची ब्याग हिसकावून घेतली व मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे स्वताचा जीव वाचवून वरील चार जन निमगाव खलु गावात आले व गावातील लोकांनी त्यांना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला त्यानुसार यवतमाळ येथील तरून पोलिस ठाण्यात आले पोलिसांनी त्यातील दोन तरुणांना घेवून पुन्हा घटना स्थळ गाठले व त्या परिसरात राहणार्या भटक्या समाजाच्या वस्त्यावर छापा टाकला असता त्याठिकाणी असणार्या आरोपींना पकडले आहे.या घटनेत 5 पुरुष व एका महिलेला ताब्यात घेतले त्या आरोपींकडून यवतमाळ च्या तरुणाचे कपडे व ब्याग हस्तगत करण्यात आली आहे सहभागी झाले होते.