Breaking News

शपथेला स्मरुन पाच वर्षे कारभार केला

 जामखेड । प्रतिनिधी । 20 - मागील निवडणूकीमध्ये  शनि देवतासमोर घेतलेल्या शपथेला स्मरून पाच वर्ष सभासद हिताचा कारभार केला व  दिलेल्या वचननाम्यांची पुर्तता  केली असल्याचे मत शिक्षक बॅकेचे  माजी व्हा चेअरमन तथा संचालक नारायण राऊत यांनी जामखेड येथील प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी केले. 
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅकेच्या निवडणूक प्रचारार्थ सदिच्छा महाआघाडीचा  प्रचाराचा शुभारंभ दि. 19 फेबु्रवारी रोजी जामखेड शहरातून सभासंदाची भव्य प्रचार फेरी काढून नंतर सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक कोंडीबा कांबळे, शिक्षक नेते दत्तात्रय राळेभात, रघुनाथ कात्रजकर, बजरंग कुलथे, इम्राहिम शेख, त्रिबंक एकबोटे, बॅकेचे उमेदवार केशव कोल्हे, विकास मंडळाचे उमेदवार संतोष हापटे, केंद्र प्रमुख सुनिल बुध्दीवंत, हनुमंत गायकवाड, तालूकाध्यक्ष संभाजी जाधव, बाळासाहेब मोरे यासह सर्व शिक्षक शिक्षिका सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. 
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, गुरूकुलच्या काळात बजाज अलायन्स पॉलिसीच्या नावाखाली सभासदांना फसविण्याचे काम केले असुन त्यांची परत फेड म्हणुन त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. पुन्हा एकदा सभासंदानी विश्‍वास दाखवून  सदिच्छा मंडळाच्या ताब्यात बॅक दिली. सभासदांच्या विश्‍वासाला पात्र राहुन सभासद हिताचे निर्णय घेतले यामध्ये एसएमएस सुविधा, लॉकर सुविधा,एटीएम सुविधा, कॉरबॉकींग सभासद अपघाती विमा,आरटीजीएस एनईएफटी सुविधा, या सारखे निर्णय घेतले. यामध्ये प्रामुख्याने मागील पंचवार्शिक निवडणूकीत दिलेल्या वचननाम्याला कटीबध्द राहुन कठलीही नोकरी भरती व जागा खरेदी केली नाही.समिती सदस्यांनीही सहभाग नोंदविला.