देहविक्रीचा यवसाय करणा-या सहा युवतींना पोलिसांनी घेतले ताब्यात
अमरावती, 25 - शहरातील कठोरा मार्गावरील एका प्रशस्त्र अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅटमध्ये देहविक्रीचा यवसाय करणा-या सहा युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील दोन महिन्यांपासून एका महिलेने या अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट भाड्याने घेतले. घरमालक अमरावतीत राहत नसत्याने त्यांच्या फ्लॅटमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली.
- दलालांच्या माध्यमातून हायप्रोफाईल अड्ड्यावर ग्राहकांना आणले जात होते. कमिशन तत्त्वावर हा व्यवसाय येथे चालवला जात होता. अमरावतीमध्ये यापूर्वीही अनेकदा अशी प्रकरणं उघडकीस आली आहेत. या युवती चंद्रपूर, अमरावती व गुजरातमधील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईदरम्यान उपायुक्त सोमनाथ घार्गे, पोलिस निरीक्षक दिलीप पाटील उपस्थित होते.