आर्थिक तुटीसह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केला लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प
नवी दिल्ली, 25 - आर्थिक तुटीसह विविध आव्हानांचा सामना करत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवार लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केला.
प्रभू यांनी आज आपला दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना भविष्यात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या योजनांवर अधिक भर दिला. गाड्यांचा वेग वाढविण्याबरोबर रेल्वेचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. 2015-2019 या काळात सुमारे 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट असून, 2015-16 मध्ये एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट आहे.
2016 - रेल्वे अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये
- रेल्वेला विकासाचा कणा बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे
- भारतीय रेल्वे हे आर्थिक विकासाचे इंजिन
- रेल्वे अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता
- रेल्वे देशाला जोडण्याचे काम करते
- हा अर्थसंकल्प माझ्या एकट्याचा नाही, तर सार्या भारताचे प्रतिनिधित्व आहे
- फक्त रेल्वे भाडेवाढ न करता नवीन उत्पन्नाचे स्त्रोत आणण्याचे प्रय़त्न करण्यात येणार
- जगभरात मंदीचा काळ सुरु असताना रेल्वे नफ्यात आणण्याचा प्रय़त्न
- मालवाहतूक दरात वाढ करून प्रवासी दरातील तूट कमी करण्याचा प्रयत्न
- 2015-19 या काळात सुमारे 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट
- सर्वांनी मिळवून नवनिर्मितीची गरज
- रेल्वेच्या प्रगतीसाठी पारंपारिक मार्ग बंद केले जातील
- मानवरहित फटकांना इतिहासजमा करण्याचा आमचा प्रयत्न
- यंदा रेल्वेतील गुंतवणूक दुप्पट होईल, कामाच्या पद्धतीत बदल
- येत्या वर्षात 1 लाख 84 हजार 820 कोटींचं लक्ष्य, 8 टक्के उत्पन्न वाढवणार
- रेल्वेची कर्मचारी संख्या 13,07109 आहे, यावरून रेल्वेची व्याप्ती लक्षात येते.
- 2016 मध्ये 8 हजार 720 कोटींची बचत अपेक्षित
- एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढविला जाईल
- गेल्यावर्षी करण्यात आलेल्या 139 घोषणांवर कार्यवाही करण्यात येत आहे
- 2020 पर्यंत मालगाड्यांची सरासरी वेग 50 किमी प्रती तास आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वेग 80 किमी प्रती तास करण्याचा उद्देश
- वेळेवर रेल्वे आरक्षण मिळण्याचे लक्ष्य
- 2020 पर्यंत सर्व रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार चालविण्याचे लक्ष्य
- जेव्हा पाहिजे तेव्हा तिकीट मिळण्याचे 2020 पर्यंत सुरु होणार
- रेल्वे उत्पन्नासाठी अन्य पर्यायांचा विचार केला जाईल
- येत्या काळात दररोज 19 किमी रेल्वे मार्ग सुरु करण्याचा विचार
- पुढील वर्षी 2500 किमी नवे मार्ग उभारण्याचे लक्ष्य
- गाड्यांमधून मलमूत्र विसर्जन थांबविणार
- कामात पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करणार
- रेल्वेमध्ये 1 लाख 21 कोटींचे लक्ष्य
- एलआयसी रेल्वेमध्ये पुढील वर्षी दीड लाख कोटींची गुंतवणूक करणार
- रेल्वेच्या विद्युतीकरणावर येत्या दोन वर्षांत भर देणार
- रेल्वेतील सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती करण्यात येईल
- मुंबई उपनगरी सेवा दररोज 7.4 मिलियन प्रवाशांची वाहतूक करते, दिल्ली मेट्रोच्या तिप्पट हा आकडा आहे.
- रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 5 वर्षांत 8.5 लाख कोटी खर्च करणार
- 2020 पर्यंत रेल्वेचा सरासरी वेग 50 किमी प्रतीतास करण्याचा प्रयत्न
- 124 खासदारांनी रेल्वेच्या सुधारणांसाठी निधी दिले आहेत
- मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वेचे दोन कारखाने सुरु करण्यात येणार
- जनरल डब्यातही मोबाईल चार्जरची सुविधा उपलब्ध करुन देणार
- 400 रेल्वे स्थानके पीपीपी तत्वानुसार विकसित करणार
- रेल्वे स्थानकांवर 2500 हजार पाणी पिण्याच्या सुविधा उपलब्ध करणार
- रेल्वेसंबंधी तक्रारींसाठी फोनलाईन्स उपलब्ध करणार
- बिहारसर पूर्वेकडील राज्यांना रोजगार देणार
- वाराणसी ते दिल्ली नवी रेल्वेसेवा सुरू होणार
- ई तिकीटासाठी संकेतस्थळाची क्षमता वाढविली, आता 7 हजार तिकीटे काढता येणार
- महिलांच्या सुरक्षेसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु होणार
- 182 हा महिला प्रवाशांसाठी हेल्पलाईन नंबर
- दोन वर्षांत 400 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा पुरविणार
- रेल्वे आणि सामान्य प्रवाशांमध्ये संवादासाठी गेल्या वर्षभरात विशेष प्रयत्न केले
- महिला आणि वृद्धांसाठी लोअर बर्थसाठी विशेष कोटा
- 92 हजार 714 कोटी रुपयांचे नवे प्रकल्प रेल्वे यावर्षी हाती घेणार
- मार्चअखेर 17 हजार बायोटॉयलेट्स स्थानके आणि गाड्यांमध्ये बसवणार
- श्रीनगरला रेल्वेमार्गांनी जोडण्याचे काम लवकरच पूर्ण करणार
- ब्रॉड गेज सेवा 36 टक्के वाढवण्याचे लक्ष्य
- मणिपूर आणि मिझोरमला लवकरच ब्रॉड गेजनं जोडलं जाईलः
- सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यात येतील
- बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार
- दृष्टीहिन प्रवाशांसाठी रेल्वे डब्यांमध्ये ब्रेल लिपीतील सूचनांची सोय करणार
- 2016-17 मध्ये संपूर्णपणे पेपरलेस कॉन्ट्रॅक्ट पद्धती राबवणार
- अपंगांना जाता येईल अशी स्वच्छतागृहे स्थानकांवर उभारणार
- 10 मार्गावर अनारक्षित अंत्योदय एक्स्प्रेस चालणार
- बोगीत कचरा दिसल्यास तातडीने स्वच्छतेची मागणी करु शकणार
- रेल्वे प्रवासादरम्यान विमा उतरविण्याची सोय उपलब्ध करणार
- गरम दूध, पाणी आणि नवजात अर्भकांसाठी खाद्यपदार्थ रेल्वे स्टेशनांवर आणि ट्रेनमध्ये उपलब्ध होणार
- लहान मुलांसाठी वेगळे जेवण उपलब्ध असेल
- मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्याच्या दिशेने पाऊल
- चर्चगेट ते विरार, सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉरचे लक्ष्य
- एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरवात
- हमसफर, तेजस आणि उदय या तीन नव्या आरक्षित गाड्यांची घोषणा
- तेजस रेल्वेचा वेग ताशी 130 किमी असेल
- हमालांना आता कुलीऐवजी सहाय्यक या नव्या नावाने ओळखले जाणार, ड्रेसकोड बदलणार
- 139 क्रमांकावर रेल्वे तिकीट रद्द करता येणार
- दिल्लीत रिंग रेलच्या माध्यमातून 21 स्थानके जोडण्यात येणार
- तिर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी आस्था योजना राबविण्यात येणार
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपानची मदत घेणार
- केरळ ते दिल्ली प्रवास सहा तासांहून कमी करण्याचा प्रयत्न
- वृद्धांना प्रवासात मदत करण्यासाठी सारथी सेवा
- रेल्वेला महसूल मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार
- पत्रकारांसाठी विशेष आरक्षण सेवा देणार
- गरीब रथ आता दीनदयाळ रथ नावाने ओळखणार
- डब्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभ्यास करुन निर्णय घेणार
- प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एफएम रेडिओ स्टेशनसोबत बोलणी सुरु
- मुंबईत प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम वेगाने करणार
- तात्काळ तिकीटांच्या खिडक्यांवर सीसीटीव्ही बसविणार
- रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करणार
- मोठ्या स्टेशनवर स्थानिक खादयपदार्थ उपलब्ध करण्याची सोय
- महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर तिकीटांना बार कोड देणार
- रेल्वेची समोरासमोर धडक रोखण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार
- लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये स्वच्छतेसाठी ‘क्लिन माय कोच‘ ही नवी एसएमएस सेवा सुरू करणार
- रेल्वेचा पहिला ऑटो हब चेन्नईमध्ये उभारणार
अजमेर, अमृतसर, मथुरा, नांदेड, नाशिक रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरणाला प्राधान्य