स्पर्धेत फाइट करताना भारतीय रेसलर खली गंभीर जखमी
उत्तराखंड, 25 - - स्पर्धेत फाइट करताना भारतीय रेसलर खली गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. सुरुवातीला त्याला हल्द्ववानी येथील एका रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्या ठिकाणाहून त्याला गुरुवारी सकाळी हेलिकॉप्टमधून डेहराडून येथे आणण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
खली याच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरने सांगितले, त्याची छाती, मान आणि डोक्याला गंभीर इजा झालेली आहे.
डोक्याला गंभीर इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेले. एवढेच नाही तर त्याच्या पाठीच्या कण्ह्यालाही इजा झाली. या स्पर्धेत एका महिला खेळाडूच्या हातालाही दुखापत झाली.