Breaking News

स्काय ड्रीम घेणार दोन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दायित्व - कांचन अग्रवाल

नाशिक/प्रतिनिधी। 21 -  कोवळ्या मनांवर केलेले संस्कार आणि या शिदोरीतच जीवनाचे पोषणमुल्य असतात. या उदात्त हेतूने बालशिक्षणाचे धडे देणार्‍या स्काय ड्रीम प्री स्कूलचा पहिला वार्षिक स्नेह सोहळा संपन्न झाला.
शिवजयंतीच्या रम्य सायंकाळी गंगापूर रोडवरील वृंदावन लॉन्सच्या हिरवळीवर आयोजित या चिमुकल्यांच्या स्नेहसोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, दोन वर्षांपासून 6 वर्षापर्यंतच्या चिमुकल्या पावलांचं थिरकणं अन् मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द नृत्यकलाकार, बिनबायकांचा तमाशा फेम प्रकाश पवार यांच्या लावणीची दिलखेचक अदा.
 चिमुकल्यांच्या कलागुणांचे कौतूक करण्यासाठी नगरसेवक विक्रांत मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे छबु नागरे, क्रिएटीव्हचे ललीत पालवे, राम स्वरूप अग्रवाल यांच्यासह पालकांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.
स्नेहसोहळ्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या चिमुकल्या विजेत्यांना मेडल आणि प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा विजेता मा. देवांग वेदिका, अनिष कुमार तर म्युझिकल चेअरव्हीलसाठी राजवीरला गोल्डमेडल प्रदान करण्यात आले.