शिवजयंतीचे औचित्यः आ. बच्चू कडू फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम
नाशिक/प्रतिनिधी। 21 - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 386 व्या जयंती निमित्त पेठ फाटा येथे अंध-अपंग व मुकबधीर बांधवांना रोजगाराची संधी मिळावी तसेच व्यवसायातून स्वावलंबी बनावे या उदात्त हेतूने जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेचे संचालक सुधिर पगार यांच्या आर्थिक सहयोगातून ज्यूस व्यवसायासाठी ज्यूसर मशिनच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर साहित्य जालिंदर रणमाळे आणि दत्ता रणमाळे या मुकबधिर बंधूंना देण्यात आले. तसेच मखमलाबाद येथील युवा कार्यकर्ते अंकुश काकड यांच्या सहयोगातून अंध व्यक्तींना मसाज थेरपी या व्यवसायासाठी मसाज मशिनचे वाटप करण्यात आले.
सदर साहित्य अनिल पिंगळे व विजय गोसावी या अंध व्यक्तींना देण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रथम बँकेचे संचालक रमेश राख यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संचालक, सुधीर पगार व महेश आव्हाड यांच्या हस्ते मुकबधीर बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शिवाजी वंजारी आणि सोमनाथ नागरे यांच्या हस्ते अंधव्यक्तींना मशीन वाटप करण्यात आली. प्रास्तविक आमदार बच्चू कडू फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्तू बोडके यांनी केले. सदर कार्यक्रम प्रसंगी बँकेचे संचालक दिलीप सानप, उत्तमराव गांगुर्डे, रमण मोरे, निलेश देशमुख, सुनिल बच्छाव, हरिभाऊ रणमाळे, तसेच सामाजिक
कार्यकर्त्या मिनाबेन पटेल, शब्बीर आरसेवाला, नंदू वर्हाडे, अॅड. अमोल घुगे, गणेश रणमाणे, शरद लभडे, विशाल ससाने, संदिप धात्रक, भरत घुगे,
धनंजय घुगे, पवन डोईफोडे, सूरज खेडकर, शोएब सिध्दीकी, बी.ए.शाह, विशाल डोंमाडे, अक्षय जगताप, पंकज यादव, मंगेश वराडे, नारायण पाटील,
पवन ताडगे, लोकेश केकाण आणि इतर अंध, अपंग व मुकबधीर बांधव उपस्थित होते.