संघाची विचारसरणी लादण्याचा भाजपचा डाव : खा. राहुल गांधी
नवी दिल्ली/प्रतिनिधी । 24 - देशात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) न ऐकल्यास तुम्हाला संपवले जाते, रोहित वेमुला भारताच्या भविष्याबद्दल बोलत होता. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते मान्य नव्हते. संघाला आपली विचारसरणी देशात राबवायची असून, विरोधी बोलणार्यास चिरडून टाकण्याचे संघाचे धोरण असल्याची जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी जंतर मंतर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राहुल गांधी सहभागी झाले होते. देशभरातील विविध विद्यार्थी संघटनांकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात एनएसयूआय, डावे पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, संसदेत आज झालेल्या भाषणात सरकारच्या भूतकाळातील योजनांबद्दल बोलण्यात आले. पण, आरएसएसच्या विचारसरणीबद्दल कोणीच काही बोलत नाही. सरकारने सुरु केलेल्या योजनांबद्दल बोलण्यात आले, पण रोहित वेमुला व हरियानातील परिस्थितीबद्दल काहीच बोलण्यात येत नाही. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कायदा
बनविण्यात यावा, अशी मागणी मी यापूर्वीही केली आहे.देशभरातील विविध विद्यार्थी संघटनांकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात एनएसयूआय, डावे पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या आहेत.
केंद्र सरकार दलित विरोधी : केजरीवाल
रोहितला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, या देशात अन्याय सहन केला जाणार नाही. केंद्र सरकार दलित विरोधी आहे. या सरकारवर सर्वच नाराज आहेत अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी जंतर मंतर येथे देशभरातील विविध विद्यार्थी संघटनांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पाठींबा देण्यासाठी केजरीवाल सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.