Breaking News

चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न

इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी या देशात अनेक शतकांपासून प्रतिगामी शक्ती सरसावली आहे. त्यांचा दुर्धर आजार आजचा नाही,तरीही त्यांनी आपल्या तकलादू बुध्दीमत्तेचा वापर करून भारतीय इतिहासात फेरफार करण्यासाठी पध्दतशीरपणे यंत्रणा पेरली आहे. परंतू आजचा बहूजन समाज हा सजग असल्यामुळेच त्यांची ही रणनिती सपशेल अपयशी ठरली आहे. मात्र काही ऐतिहासिक घटनांकडे जर आपण साफ दुर्लक्ष केले तर, इतिहासाची तोडमोड करून, त्यासाठी खोटे पुरावे सादर करून ,आपले तथ्थ खरे असल्याचा आव या प्रतिगामी शक्ती हजारो वर्षापासून राबवत आहेत. मात्र बहूजन इतिहासकारांनी सत्य शोधून हा इतिहास ही तथ्थे जपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू या बहूजन इतिहासकारांनी केलेली संशोधनाची दखल  शासन दरबारी घेतली जात नाही. त्यातून सरकारची विचारसरणी व छूपी रणनिती स्पष्ट होते. देशाच्या पंतप्रधांनीच गणेशोत्वाच्या काळात पंतप्रधानांनी प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होती, असे वक्तव्य केले. देशात पुरातन काळात रिव्हर्स गिअर विमाने अस्तित्वात होती, असे दावे केले गेले होते, याला काय म्हणावे. या गोष्टीला कोणताही शास्त्रीय आधार नाही, त्याला नाकारण्याऐवजी स्वीकारण्याची भूमिका ही प्रतिगामी शक्तीकडून सातत्यांने घडत आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुबंईत देशातील निवडक इतिहासकार,लेखक, विचारवंत बैठक घ्यावी लागली. अर्थात त्या बैठकीचा सुर देखील आजच्या सरकारने इतिहासाचे चालविलेले विकृतीकरण यावर होता. भारतीय इतिहासाची केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मोडतोड क
रत असून चुकीची तथ्ये आणि घटना सत्य म्हणून मांडली जात आहेत. भारताची विविधता मूळ इतिहास बदलून संपवण्याचे हे कारस्थान असून या माध्यमातून धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्र घडवण्याचे प्रयत्न हाणून पाडू,तसेच इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी एकवटलेल्या इतिहासतज्ज्ञांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची ग्वाहीही याबैठकीत देण्यात आली.वास्तविक बघता इतिहास लिहिण्याची साधने हजारो वर्षापासून एकाच समूहाकडे होती. मात्र भारतीय संविधानाने देशातील नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिल्यामुळे इथला बहूजन समाज हा लिहू, वाचू लागला आहे. तो आजच्या घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवून त्याची दखल घेवू लागला आहे. इतिहासाचे लेखन करू लागला आहे. असे असतांना इथला प्रस्थापित समाज बुध्दीभेद करून चुकीचा इतिहास खपवण्याचा प्रयत्न करू पाहत आहे. मात्र या षडयंत्राला बहूजन समाज कदापि बळी पडणार नाही. बहूजनांच्या महापुरूषांचे विचार इथल्या प्रस्थापित समाजाने कधी स्वीकारले नाही,मात्र त्यांना फिजिकलदृष्टया स्वीकारून आम्ही त्यांना स्वीकारले असा भास निर्माण करण्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले असले तरी बहूजन  विचारवंतानी त्यांची ही खेळी चांगलीच ओळखली आहे. त्यामुळे त्यांचा बहूजन कळवळा जास्तकाळ टिकू शकणार नाही.त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण होणार नाही, एखादे वाक्य बहूजन महापुरूषांच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न झाल्यास बहूजन समाजाने सजग राहून त्याला उत्तर देण्याची गरज आहे. आज अनेक राज्यातील आंदोलने त्याची साक्ष आहे. मग ते इतिहासाची मोडतोड करणे 
असेल किंवा दलितांचा आवाज संपवणे यासारख्या घटना असेल,त्याला बहूजन समाजातून नेहमीच प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. बहूजन समाजाल आता
इथला इतिहास, भविष्यकाळ, आणि वर्तमानकाळ चांगलाच माहिती झाला आहे. त्यामुळे फसव्या गोष्टी इतिहासाच्या नावाने खपणार नाही हे मात्र नक्की