अवैध गौण खनिज वाहतूक करणार्या वाहनांवर होणार कारवाई
बुलडाणा, 20 - जिल्ह्यातील अवैध गौण खनिजाची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच 20 फेब्रुवारी पासून अशा वाहन मालकांच्या परवान्यांचे निलंबनही केल्या जाणार आहे. ट्रॅक्टर/ट्रेलर व परिवहनेत्तर वाहन अवैध गौण खनिज वाहतूक करताना आढळल्यास पहिल्या व दुसर्या गुन्ह्यासाठी 90 दिवस नोंदणी निलंबन वाहन जप्त केलेल्या जागेवर करण्यात येणार आहे.
तसेच तिसर्या गुन्ह्यासाठी नोंदणी रद्द करण्यात येईल. ट्रक/ट्रेलर/डी. व्हॅन/ पी. व्हॅन व परिवहन वाहन अवैध गौण खनिजाची वाहतूक करताना आढळल्यास पहिल्या व दुसर्या गुन्ह्यासाठी वाहन जप्त केलेल्या जागेवर
90 दिवसांसाठी नोंदणी निलंबन केल्या जाईल. तसेच तिसर्या गुन्ह्यासाठी परवाना रद्द करण्यात येईल. याबाबत परिवहन प्राधिकारणाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्यावेळी कारवाईचा ठराव घेण्यात आला.