Breaking News

दुष्काळाग्रस्त शेतकर्‍यांच्या न्याय मागण्यासाठी प्रसंगी सभागृह बंद पाडू- आ.अमरसिंह पंडित

बीड,दि. 7 - मराठवाड्यासारख्या दुष्काळाग्रस्त भागातील सिंचन आणि कापूस प्रश्‍नी शासनाने अधिवेशन सुरू होण्यापूर्वी कार्यवाही न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने दुष्काळाग्रस्त शेतकर्‍यांच्या न्याय मागण्यांसाठी शासनाला सभागृहात जाब विचारण्यात येईल, प्रसंगी अधिवेशनाचे कामकाज बंद पाडू असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसे पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी दिला. मौजे पेंडगाव येथे आमदार स्थानिक विकास निधीतून बांधण्यात येणार्‍या सिमेंट बंधारा आणि नदीच्या विस्तारीकण कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी पेंडगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजे पेंडगाव येथे आ.अमरसिंह पंडित यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून सुमारे 17 लक्ष रू.किंमतीच्या सिमेंट बंधारा बांधकामाचा व नदी खोलीकरणाचा शुभारंभ आ.अमरसिंह पंडित यांचया शुभहस्ते शुक्रवार दि.5 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती अप्पासाहेब गव्हाणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कैलास नलावडे, गणेशअण्णा नेवडे, दिगांबर येवले, जगनपाटील काळे, सरपंच अशोक लांडे, सुधीर काकडे उपअभियंता बी.एच.गर्जे, शाखा अभियंता आर.डी.पठाण गोविंद कदम, गोपाळ गुरखूदे, सुनिल काळकुटे, विश्‍वांभर गाडे, गणेश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात कृ.ऊ.बा. समितीचे माजी सभापती गणेश नेवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक अशोक ढास यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण चव्हाण यांनी तर आभार गणेश डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमास श्रीकृष्ण बहिर, दत्तात्रय गाडे, वैजिनाथ काळकुटे, सुरेश गाडे, लक्ष्मण गाडे, शशिकांत डोंगरे, तुकाराम काहकुटे, संदीप पाटील, राजु शेख, वासुदेव पाटील सोनू डोंगरे, राम दांगट, दत्तात्रय तिपाले यांच्यासह पेंडगाव आणि परिसरातील ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.