Breaking News

पाण्याबाबत जागृतीसाठी सातारा पालिकेचे नगराध्यक्ष रस्त्यावर

सातारा, 07 -  सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी तीव्र दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. दुष्काळीभागातील जनतेला आज आणि उद्या जगण्यासाठी आणि जनावरांना जगवण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागत आहे, दुष्काळी जनतेच्या मनात कधी नव्हे इतकी प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आमच्या वाढदिवसाचे आम्हास मुळीच औत्सूक्य वाटत नाही. सबब आम्ही आमच्या वाढदिवसानिमित्त कोणाच्याही कसल्याही शुभेच्छा स्विकारणार नाही. आमचे अभिष्टचिंतन करण्याचे बोर्ड, बॅनर्स, जाहिराती कोणीही न करता त्याऐवजी सुसुत्र पध्दतीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना हातभार लावून दुष्काळी जनतेचे अश्रू पुसण्यासाठी आपले खारीचे योगदान द्यावे, असे भावनिक आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
आमच्या वाढदिवसानिमित्त अनेकजण आमच्यावर प्रेम व्यक्त करत असतात. जनतेचा या प्रेमाची किंमत कधीच करता येणे शक्य नाही, जनतेने आम्हास इतके निर्व्यांज प्रेम दिले आहे की आम्ही कधीच त्यामधुन उतराई होणे शक्य नाही. सातारा जिल्हा, महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम व्यक्तीं यांनी आम्हास भरभरुन दिलेले आहे. त्याविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. तथापि गेल्या काही वर्षापासून दुष्काळाच्या झळा वारंवार बसु लागल्या आहेत. यंदा सन 1972 पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत, विविध कारणांमुळे शेतकरी वर्ग जगला काय आणि वाचला काय याबाबत कुणाला सोयरसुतक राहीले नाही.  दुष्काळी जनतेचा आक्रोश दिसत असुनही न दिसणार्‍यापैकी आम्ही नाही, त्यामुळेच आम्ही वरील निर्णय घेतला आहे. आमच्या निर्णयामुळे काही जणांचा निश्‍चित हिरमोड होईल तथापि शेतकरी जगला पाहीजे आणि तो चांगल्या पध्दतीने जगला पाहीजे ही आमची भुमिका त्यांनाही पटेल. सुदैवाने राज्यातील पत्रकारीता आजही दमदारपणे समाजाला दिशा देत आहे. त्यांनी अधिकारवाणीने दुष्काळाचा दुर्दैवी फेरा समाजापुढे मांडावा आणि ते निश्‍चितपणे मांडतील. या कारणामुळे आमच्या आवाहनास आमच्या असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, पाठराखे, जीवलग व्यक्ती, संस्था आणि आम्हास प्राणप्रिय असलेल्या जनतेकडून निश्‍चितच सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि दुष्काळी जनतेसाठी सर्वाना काहीतरी करता येईल, असेही खा. उदयनराजे यांनी नमुद केले.