विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने मुरूड घटनेतील विद्यार्थ्यांना श्रद्धांजली
बीड,दि. 7 - रायगड जिल्हातील मुरूड येथे समुद्र किनारी पुणे येथील विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून झालेला मृत्यू ही मोठी दुर्दैवी घटना असून यामुळे महाराष्ट्रावर शोककळ पसरली असल्याचे मत विर भगतसिंह विद्यार्थ्यांची परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांनी व्यक्त केले ते संघटनेच्या वतीने या घटनेतील मृतात्म्यास श्रद्धाजंली अर्पण केल्यानंतर बोलत होते.
मुरूड येथे समुद्राच्या लाटेत 14 विद्यार्थ्यांचा दुर्दैंवी अंत झाला. त्यांना विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने बीड शहरातील जिजामाता उद्यान, राजीव गांधी चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना कँडल लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना आमटे म्हणाले की, देशाची युवा पिढी बरोबर अशा प्रकारच्या घटन घडणे म्हणजे देाचै दुर्दैव असून त्यांच्या कुटूंबाच्या पाठीशी विर भगतसिंग विद्यार्थ्या परिषद खंबीरपणे उभी आहे. तसेच विनोद अप्पा इंगोले यांनी श्रद्धाजली अर्पण करताना म्हटले की, विद्यार्थ्यांनी हुल्लड बुद्धीने निर्णय न घेता स्वतःच्या जिवीतास कुठलाही धोका न पत्कारता सहल कराव्यात व देशसेवेला वेळ द्यावा.याप्रसंगी बापुसाहेब शिंदे, जयप्रकाश आघाव, अॅड.महेश धांडे, शुभम धुत, जयंत वाघ, सुरज चुंगडे, वैभव कोठेकर आदींची उपस्थिती होती.