सफाई कामगार पदावर नियुक्तीसाठी उपोषण
बुलडाणा (प्रतिनिधी) । 23 - लाड कमेटीच्या शिफारशी नुसार वशिला पध्दती अंतर्गत मिळालेली नियुक्ती कायम करण्यात यावी तसेच कामावरुन कमी केल्यानंतर थकीत वेतन देण्यात यावे, आदि मागण्यांकरीता सलीम बेग इब्राहिम बेग तसेच शमाबी सलीम बेग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 22 फेब्रुवारी पासुन आमरण उपोषण सुरु केले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, लाड कमेटीच्या शिफारशी नुसार वशिला पध्दती अंतर्गत नियुक्ती कायम करण्याबाबतचे निवेदन नगर परिषद प्रशासनाकडे दिले होते. परंतु त्यावर न.प.प्रशासनाकडून कोणतीही भुमिका घेण्यात आली नाही. तसेच मला न.प.प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कोणताही पत्र व्यवहार करण्यात आला नाही. तसेच थकीत वेतनही दिले नाही. कामावर हजर असतांना हजेरी न लावता हेत्तुपूरस्सर नुकसान करण्यात आले. असे निवेदनात म्हटले आहे. सफाई कामगारांच्या नियुक्ती नंतर शासनसेवा पुर्ण करण्यास त्याच्या जागी वारसाहक्काने नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस आहे. त्यावर मुख्याधिकारी यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणुन सलीम बेग इाब्राहिम बेग यांनी आज पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.