मौलाना आझाद यांना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिवादन
नाशिक/प्रतिनिधी। 23 - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मौलाना आझाद यांची पुण्यतिथी राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथे साजरी करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नानासाहेब महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मौलाना आझाद यांनी केलेल्या कार्याविषयी माहिती दिली. अल्पसंख्याक समाजातील मुस्लीम बांधवानी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजात परिवर्तन करावे. मौलाना आझाद हे महात्मा गांधीचे महान अनुयायी होते व गांधीजी बरोबर मिळून रोलेट एक्ट ची 1919 मध्ये रक्षा केली. मौलाना आझाद हे कवि, लेखक, पत्रकार अशा विविध बाबींनी परिपूर्ण होते म्हणूनच त्यांना भारताचे पहिले शिक्षा मंत्री केले होते. पण आता विविध बाबींमुळे मुस्लीम समाज हा शिक्षणाकडे दुर्लक्ष करत चालला आहे त्यांनी मौलाना आझाद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.
यावेळी शहर कार्याध्यक्ष छबुजी नागरे, नितीन चंद्रमोरे, प्रियांका शर्मा, दत्ताकाका पाटील, चिन्मय गाढे, अल्ताफ पठाण, अरविंद सोनवणे, मिलिंद पगारे, रवींद्र गामणे, रेहान शेख, राहुल धोंगडे, हाजी आरिफ पटेल, भारत गांगुर्डे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.