शिवकार्य गडकोट मोहीमतर्फे किल्ले वाचवा संदेश
नाशिक/प्रतिनिधी। 23 - शिवकार्य गडकोट मोहिमेच्या माध्यमातून शिवजयंती (19 फेब्रुवारी 2016) रोजी किल्ले वाचवा असा संदेश हजार 3नागरिक,विध्यार्थी,संघटना,आणि शिवभक्तांपर्यंत पोहोचवण्यात आला.
यावेळी दुर्गांची महती,त्यांचा दुर्गम्य इतिहास सांगून किल्ल्यांची व्यथा आणि दैना चित्र प्रदर्शनीद्वारे,व्याख्यान,दुर्गांसाठी श्रमदानाच्या मोहिमा व अनुभव सांगून किल्ले वाचवा,निसर्ग पशू पक्षी वाचवा,इतिहास वाचवा, किल्ल्यावरील जलश्रोत वाचवा असा संदेश देण्यात आला. नाशिकच्या सी बी एस
जवळील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील प्रांगणात हा दुर्गजागृत्ती अभियानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या वेळी किल्ले वाचवा प्रदर्शनी ची पाहणी व शिवकार्य गडकोट मोहिमेची किल्ले संवर्धन कार्याची माहिती माहिती महापौर अशोक मुर्तडक, उप महापौर गुरुमित बग्गा, मनपा आयुक्त गेडामसाहेब, मनपाचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, यासह माजी महापौर अशोक दिवे, जेष्ठ पत्रकार पा.भा.करंजकर, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, नशाबंदी मंच चे अविनाश आहेर, गं.पा.माने ,छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, महंत चक्रपाणी महाराज,जेष्ठ दुर्ग संवर्धक शिवाजी गाडे, आयटक चे प्रा.राजू देसले,प्रा.सोमनाथ मुठाळ, निवृत्ती कसबे, भीमशक्ती शिवशक्तीचे जिल्हाध्यक्ष नारायण गायकवाड, बागलाण शिवजयंती उत्सवाचे शिवभक्त, आदिवाशी संघटनेचे शार्दुल,डी.एड.चे विध्यार्थी, कन्या शाळेच्या विध्यार्थिनी यांनी या अभियानाची माहिती घेतली ,दुर्ग प्रदर्शनी बघितली.
सांगतेला बाल शाहीर करण मुसळे याचे शिवराय व त्यांचे दुर्ग विषयावर व्याख्यान झाले ,याव्रली शिवकार्य गडकोट मोहिमेच्याकिल्ले वाचवा अभियानात संस्थापक राम खुर्दळ ,मुख्य संयोजक योगेश कापसे, शिस्त पालन समिती प्रमुख पवन माळवे, हरीश पवार ,बाल दुर्गमित्र जानव्ही, बाल शाहीर करण मुसळे, महंत चक्रपाणी महाराज ,विधीज्ञ हांडगे यांनी नागरिकांशी संवाद साधला.