के.टी.एच.एम. महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
नाशिक/प्रतिनिधी। 23 - के.टी.एच.एम. महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी अशोक नायगावकर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, 1990 सालापर्यंत महिलांचा नोकरीतील सहभाग कमी होता; मात्र त्यानंतर महिलांचा सहभाग सर्व क्षेत्रांमध्ये वाढलेला आहे. 21 व्या शतकात महिलांसंदर्भातील समाजाची मानसिकता बदलली आहे. त्यामुळे महिलांची कार्यक्षमता दुपटीने वाढली, असेही नायगावकर यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस नीलिमा पवार, नितीन ठाकरे, डॉ. सुनील ढिकले, नाना महाले, डॉ. अशोक पिंगळे, धनंजय धनवटे, अलका गुंजाळ, गणपत शिंदे, डॉ. बी. व्ही. कापडणीस, शिक्षणाधिकारी प्रा. आर. एम. चौधरी, प्रा. एस. के. शिंदे, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील आदि उपस्थित होते.
सरचिटणीस नीलिमा पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते पीएच.डी., नेट, सेट उत्तीर्ण प्राध्यापक व विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावर क्रॉसकँट्री, रनिंग, फुटबाल, स्विमिंग तसेच प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.