Breaking News

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली, 27 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने ई-मेल पाठवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गृह विभागाने पोलिसांना आवश्यक पाऊलं उचलण्याची सूचना दिली आहे. 

या ई-मेलमध्ये आपण शस्त्रास्त्रांची जमवाजमव करत असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या सुरक्षेचा फेर आढावा घेण्यात आला आहे. केजरीवाल यांना सध्या झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. केजरीवाल हे सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विशेष सुरक्षेवर ध्यान देण्यात यावं असं दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांना सांगितले आहे.